आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेली दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस पाडल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आंबेडकरवादी तसेच डाव्या-पुरोगामी संघटनांच्या वतीने मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. दिल्लीतील जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार हा देखील या मोर्चामध्ये सहभागी झाला होता. भारिप-बहुजन महासंघ, डावे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या मोर्चात सहभाग […]