मनोहर पर्रिकरांनी गेल्या आठवड्यात पुण्यात केलेल्या एका वक्तव्यांमुळे सोमवारी राज्यसभेत गोंधळ उडाला. देशाविरुद्ध बोलणा-यांना चांगला ‘धडा’ शिकवला पाहिजे असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. पर्रिकरांच्या या वक्तव्याचा रोख हा अभिनेता आमीर खान याच्याकडे होता, असा आरोप त्यांच्यावर आधीच होता पण आता याच वक्तव्यामुळे राज्यसभेत विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला.