गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकर जरी त्रस्त झाले असले तरी त्यांना सुखावणारी एक गोष्ट या वरुणराजाने केली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. आठवडाभर सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे विहार आणि तुळशी हे तलाव आधीच भरुन वाहत होते. […]