वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताने विजयाच्या दिशेने कूच केली आहे. अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने पहिला डाव ५०० धावांवर घोषित करत ३०४ धावांची आघाडी घेतली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा वेस्ट इंडिजची १६ षटकांत ४ बाद ४८ अशी अवस्था होती.