14 November 2019

News Flash

पम्पोर हल्ला; दहशतवादी, सैन्यदलात २४ तासांपासून चकमक सुरूच

जम्मू काश्मीरमधील पम्पोर येथील सरकारी कार्यालयावर सोमवारी (दि. ११) दहशतवादी हल्ला झाला होता. २४ तासांपासून येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमकी उडत आहेत. या इमारतीत २ ते ३ दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलाला अद्याप यश आलेले नाही. सोमवारी रात्री दोन वेळा गोळीबार आणि धमाक्यांचे आवाज आले होते. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मंगळवारी इमारत उडवून लावायची की कमांडो ऑपरेशन करायचा याचा निर्णय होऊ शकतो असे काही वृत्त वृत्त वाहिन्यांनी दिले आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही दहशतवाद्यांनी या इमारतीला आपला निशाणा बनवले होते.

आणखी काही व्हिडिओ