मोसमी पावसाचा प्रवास कसा होतो, पाऊस अंदमानात दाखल झाल्यानंतर राज्यात येईपर्यंत त्याला वेळ का लागतो, त्याच्या प्रवासात कोणते अडथळे येतात, यंदाचा पाऊस कसा असेल, पावसाचा अंदाज कसा बांधला जातो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष वेबसंवादात भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 


 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  