चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य यांसह विविध कलांमध्ये मुशाफिरी करणारे खेळिया आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या सर्व साहित्याची सूची आता संगणकाच्या एका ‘क्लिक’वर रसिकांना उपलब्ध होणार आहे.
यामध्ये पुलंनी लिहिलेली सर्व पुस्तके, पुलंवर लिहिली गेलेली पुस्तके, पुलंच्या साहित्याचे अन्य भाषांमध्ये झालेले अनुवाद याची इत्थंभूत माहिती पुलप्रेमींना संगणकावर सहजरीत्या उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पुलंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांनी दिली. यातील तपशील वारंवार सुधारित करण्यात येणार आहेत. चला तर आजच्या या व्हिडियो मध्ये पु. ल. देशपांडे यांच्या बद्दल बोलूया.