कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. तसेच फोटो, ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा यासाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकेतील एक लाख रूपयांपासूनच्या पुढील व्यवहारासाठी पॅनकार्ड सत्कीचे करण्यात आले आहे. महत्वाचं असणाऱ्या या पॅनकार्डवर एक विशिष्ट क्रमांक असतो, ज्याला पॅन क्रमांक म्हटलं जातं. त्या क्रमांकातील प्रत्येक शब्दाचा वेगळा असा अर्थ असतो.













