लॉकडाउन आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी विवेक जगताप यांनी पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलांची शेती केली होती. या फुलांच्या शेतीसाठी या शेतकऱ्यास २४ लाखांचा खर्च आला होता. परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभी केलेली फुलशेती त्यांनी अक्षरशः रोटरीच्या साहाय्याने नष्ट केली. फुलांवर केलेला लाखो रुपये खर्च निघणे सुद्धा मुश्किल झाल्याने या शेतकऱ्यावर आपली शेती नष्ट करण्याची वेळ आली आहे.