कायदेशीर मदत न मिळाल्यामुळे आणि किरकोळ कारणांसाठी कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदींसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे महिला कैद्यांना कारागृहातून सोडवण्यासाठी मदत होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. महिलांना कायदेशीर मदत करून त्यांना कारागृहातून सोडविण्यासाठी सहकार्य करणे व त्यांचे समुपदेशन करणे याकरिता महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, तुरुंग प्रशासन यांच्यासोबत राज्य महिला आयोग सहभाग घेवून ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.