सावरकरांवर आधारित ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी पार पडला. उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमात केलेल्या भाषणात महात्मा गांधींबद्दल एक वक्तव्य केलं. महात्मा गांधींबद्दल केलेलं वक्तव्य विरोधकांनी चांगलंच उचलून धरलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
#RajnathSingh #VeerSavarkar #Controversy #MahatmaGandhi #BookLaunch