महात्मा गांधी यांच्या राजकीय व सामाजिक आंदोलनाची प्रयोगशाळा राहलेल्या सेवाग्राम आश्रमातून आज एका नव्या आंदोलनास सुरूवात झाली आहे. साबरमती आश्रमाच्या अत्याधुनिकीकरणास विरोध दर्शविण्यासाठी सेवाग्राम ते साबरमती अशी संदेशयात्रेस काढण्यात येत आहे. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात सर्वधर्म प्रार्थना करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. २३ ऑक्टोंबरला यात्रा अहमदाबादला पोहोचणार असून २४ ऑक्टोंबरला साबरमती आश्रमात जनसंवाद आयोजित करण्यात आला आहे.