पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांकडून उत्तम दर्जाच्या वस्तु तयार केल्या जातात. कैद्यामार्फत तयार करण्यात आलेल्या या वस्तूंची विक्री वर्षभर होत असते. यावर्षी या वस्तूंचे दिवाळी सणानिमित्त पुण्यात प्रदर्शन भरविण्यात आले आहे. करोना महामारीच्या काळात नागरिकांनी सर्वाधिक ऑनलाईनद्वारे खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कैद्यांनी तयार केलेल्या या वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.