पुण्यातील बालेवाडी येथील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. रात्री ११:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून त्यात आठ कामगार जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाडया घटनास्थळी पोहोचल्या आहेत.