शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने त्यांचे दु:खद निधन झाले. रुग्णालयाने परिपत्रक जरी करून ही माहिती दिली आहे.#BabasahebPurandare #बाबासाहेबपुरंदरे #शिवशाहीर #Maratha #chhatrapatishivaji #History #Historian