५९वा ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेचा ग्रँड फिनाले मणिपूर येथे संपन्न झाला आणि भारताला ‘मिस इंडिया २०२३’ मिळाली. राजस्थानातील कोटा येथून आलेली १९ वर्षीय नंदिनी गुप्ता हिने ‘मिस इंडिया २०२३’चा किताब पटकावला. तर दुसरा क्रमांक पटकावला दिल्लीच्या श्रेया पुंजा हिने आणि मणिपूरची थोनावजाम स्ट्रेला लुआंग हिचा तिसरा क्रमांक आला. नंदिनीने आपल्या विजयानंतर “हे माझ्या आईचे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालंय” अशी प्रतिक्रिया दिली.