बीड जिल्ह्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. शिवाय गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं. मात्र बीडचे पालकमंत्री अतुल सावे अद्याप शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पालकमंत्री बेपत्ता आहेत. पालकमंत्र्यांना शोधून काढणाऱ्यास ५१ रुपये बक्षीस दिलं जाईल, या आशयाचे पोस्टर देखील गेवराई तालुक्यात लावण्यात आले आहेत.