Pune: डॅाक्टरांकडे गेलो, रक्त काढून घेतलं; शरद पवारांचं नाव घेत कार्यकर्ता झाला भावूक
पुण्यातील दांडेकर पूल भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तथा रिक्षा चालक संदीप काळेने शरद पवारांना रक्ताने पत्र लिहिलं आहे. साहेब आपण अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करणार हे पत्र आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्यातील कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनं केलं होतं. तर काहींनी राजीनामेही दिले होते