Raj Thackeray: ‘अजित पवारांचं वागणं पाहून शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला’; राज ठाकरेंनी सुनावलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी या ठिकाणी सभा घेतली. राज ठाकरेंनी आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं. सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी पवारांच्या राजीनामा नाट्याचा उल्लेख केला. राज ठाकरे म्हणाले. मला असं वाटतं, शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. परंतु अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला