पुण्याच्या तळेगावमध्ये भरदिवसा किशोर आवारे यांची हत्या झालीये. आवारे हे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. नगरपरिषद कार्यालासमोर दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. कार्यालयातून बाहेर येताच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी गोळीबार करत कोयत्याने वार ही केलेत. आवारे यांनी मार्च महिन्यात सोमटने टोल नाका बंद करण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं.