‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; निर्मात्यांवर केले गंभीर आरोप | Taarak Mehta
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या मालिकेतील मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने काही महिन्यांपूर्वी या मालिकेला रामराम ठोकला. आता तिने या शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने असित मोदींबरोबरच प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार दाखल केली आहे