पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथील रहिवाशी पंकज महाले या युवकाने लग्नासाठी अनोखं आंदोलन केलंय. “बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे!” अशा आशयचा फलक हातात घेऊन रस्त्यावर फिरत बागायतदारीण वधुची मागणी करताना दिसुन आला. पंकजच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची शहरात चर्चा होत आहे आणि व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे.