कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला असून भाजपाचा पराभव झाला आहे. कर्नाटकमध्ये सत्तेच्याच्या चाव्या पुन्हा एकदा भाजपाकडून काँग्रेसकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशभर यासंदर्भात प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांकडून याच निकालाची देशभर पुनरावृत्ती होईल अशा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमवीर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, प्रचारादरम्यान काँग्रेसने दिलेली पाच आश्वासनं पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच पूर्ण केली जातील, असंही ते म्हणाले