१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरुन आता राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा सचिवांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.