पुणे शहरात अतिक्रमणाचा विषय चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमाची कारवाई करतानाचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यापैकीच एक म्हणजे पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना त्याठीकाणी असलेल्या सामानाला लाथ मारली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जगताप यांच्यावर कारवाईची मागणी केलीय. त्यावर आता जगताप यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.














