Bharat Jadhav: “रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही”; नाट्यप्रयोगादरम्यान भरत जाधव नाराज का झाले?
भरत जाधव हा मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंत विविध नाटक-मालिका-चित्रपटांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. भरत जाधव सध्या मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. रत्नागिरीत नाट्यप्रयोगादरम्यान भरत जाधवला एक भीषण अनुभव आला आहे. या अनुभवानंतर त्याने रत्नागिरीत पुन्हा प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन प्रयोगादरम्यानच त्याने हात जोडत रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असे म्हटले आहे. भरत जाधवचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.