Devendra Fadnavis: ‘मोदीविरोधाचा ज्वर ज्यांना…’; नवीन संसद भवनाच्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून सध्या विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जात आहे. राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधानांच्या हस्ते संसद भवनाचं उद्घाटन होणार यावरून काँग्रेसने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता खासदार संजय राऊतांनी देखील पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. या विरोधकांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. “लोकशाहीत कावीळ झाल्यासारखं वागायचं नसतं. मोदींच्या विरोधाचा ज्वर ज्यांना झालाय ते लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घनालाही जात नाही हे चुकीचं आहे”