Sanjay Raut on Fadnavis: ‘…एवढी वाईट वेळ आमच्यावर आली नाही’; फडणवीसांचं नाव घेत राऊतांची टीका
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद एकीकडे वाढत असताना दुसरीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यावरून भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात असताना त्यावरून आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर विरोध केला, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी आघाडी केली”,अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर त्यावरून आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे