आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या अनुषांगाने मविआमध्ये जागा वाटपाची सध्या चर्चा सुरू आहे. कोणत्या निकषांवर हा फार्म्युला ठरवला जाणार यावर खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसंच कर्नाटकचा फार्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं होतं.
  
  
  
  







 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 





