महाराष्ट्रातील पाच मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासंदर्भात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचना केल्याची चर्चा रंगू लागली आहे. यातील चार मंत्री हे शिंदे गटातील असल्याचं म्हणत या बातमीला खासदार संजय राऊतांनी दुजोरा दिला आहे. याबाबत त्यांनी पुन्हा एकादा भाष्य केलं आहे. त्या चार मंत्र्यांना काढण्याबाबत भाजपाच्या हायकमांडचा दबाव असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.












