महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये एका सर्व्हेची जाहिरात देण्यात आली आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असं शीर्षक या जाहिरातीला देण्यात आलं आहे. जाहिरातीतील अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा लोकप्रिय नेते असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावर सध्या बरीच चर्चा रंगली असून खासदार संयज राऊतांनी देखील यावर भाष्य करत शिवसेना, भाजपाला मिश्किल टोला लगावला आहे.












