कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपात धुसफुस सुरू असल्याचं दिसत आहे. स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा देण्याचं विधान केलं होतं. त्यानंतर ते दिल्लीला गेले असता अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. या दिल्ली दौऱ्यावर आता श्रीकांत शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. भांडुपमध्ये शाखा संपर्क अभियानाच्या कार्यक्रमावेळी ते माध्यमांशी बोलत
होते.