धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे राष्ट्रवादी पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. अजित पवार यांनी आपल्या भाषणा नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भाकरी फिरवण्याच्या विधानाचाही उल्लेख केला.