“उद्या २० जून म्हणजे जागतिक गद्दार दिन आहे. हा दिवस जगभर साजरा करण्यासाठी आम्ही युनोला पत्र देणार आहोत. उद्याचा दिवस गद्दार दिन साजरा करण्याची मागणी युनोकडे केली जाणार आहे. शिवसेना आणि महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने ही मागणी करणार आहे. २० जून हा सर्व जगातील गद्दारांसाठीचा दिवस राहील. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल” अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते.



















