महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष गेलं. मात्र निवडणुका घेण्याची हिंमत बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. पैसा उधळला जातो आहे, जाब विचारणारं कुणी नाही. मनपातील भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) येत्या १ जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली.











