मुंबई मनपातील भष्ट्राचाराविरोधात ठाकरे गटाच्या वतीने १ जुलैला विराट मोर्चा काढला जाणार आहे. उद्धव ठाकरेंनी यांसदर्भातील घोषणा केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. मनपाचे हजारो कोटी कुठे गेले याचा हिशोब कॅग विचारणार असून एसआयटी स्थापन झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका शिंदेंनी केली.












