देशातील भाजपा विरोधकांची २०२४ साठीच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीबाबत ‘या देशाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी २०२४ साली काय करता येईल. कारण २०२४ ची निवडणूक बहुधा शेवटची निवडणूक असेल हे संपूर्ण देशाचं मत आहे. भाजपा वगळता सगळे प्रमुख पक्ष हे आज पाटणाला जमणार आहेत. नितेश कुमार हे निमंत्रक असून त्या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार ,राहुल गांधी येत आहेत’ अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.













