पहिल्याच पावसात मुंबई पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली होती. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाऊस झालं याचं स्वागत करा. पाणी साचलं हे काय, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आमदार आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत टीका केली होती. त्यावर आता शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे.



















