बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात होऊन २५ लोकांचा मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हळहळला आहे. या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणीही केली. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदतही जाहीर केली आहे. मात्र या अपघातावरुन आणि समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांवरुन शरद पवारांनी शिंदे फडणवीस सरकारचे कान टोचले आहेत.













