Sanjay Raut:’माझं शरद पवारांशी बोलणं झालं असून…’; अजित पवारांच्या शपथविधीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आज महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाचा तिसरा अंक पाहण्यास मिळाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर इतर नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे. यावर बोलताना “हा काही राजकीय भूकंप आहे वगैरे मला वाटत नाही. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही लोकांनी शपथ घेतली ते आम्ही पाहिलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे फडणवीस सरकार अस्थिर आहे. याचा अर्थ असा आहे की शिंदेंच्या फुटीर गटासंदर्भात जो निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ते आमदार अपात्र ठरणार आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची सुरुवात आहे. त्यामुळे नवी टीम भाजपाने घेतली आहे” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.