धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे आज मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर जवळ झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी, शिवसेनेमध्ये झालं तसंच राष्ट्रवादीमध्ये देखील झालं असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी धुरा ही अजित पवार यांच्याकडेच द्यायला हवी होती, परंतु शरद पवार हे सध्या मुलीच्या प्रेमात पडले त्यांना मुलीचा मोह झाला. त्यामुळे आणि सर्वच जबाबदाऱ्या या सुप्रिया ताईंनाच देण्यात आल्याने त्यांचे उजवे डावे हात देखील नाराज झाल्याने हे बंड झाले असल्याची प्रतिक्रिया महाजन यांनी दिली.












