Samarjeetsinh Ghatge यांचे कागलमध्ये शक्तीप्रदर्शन!; मुश्रीफांना मंत्रिपद दिल्याने नाराज? | Kolhapur
कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी राज्याच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेऊन अजित पवार यांच्या माध्यमातून घेऊन मंत्रीपद पटकावले. त्यामुळे कोल्हापूर भाजपाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे नाराज झाले असून ते पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू होती. मात्र या सर्व गोष्टींना नकार देत करीत आज घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघ लढणार आणि विक्रमी मताधिक्याने निवडणूक जिंकणार असा निर्धार केला. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या बदललेल्या भूमिकेवरही टीका केली.