२ जुलै रोजी अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या एकूण नऊ मंत्र्यांचा शपथविधीही त्याच दिवशी पार पडला. आधी शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाला आणि त्यानंतर वर्षभराने अजित पवारांनी सत्तेत येण्याचा निर्णय घेतला त्यानंतर खातेवाटप करण्यात आलं. यात सर्व वजनदार खाती राष्ट्रवादीला देण्यात आली असल्याची चर्चा असताना यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तिसरा भीडू आल्यामुळे मंत्रिमंडळाचा जो विस्तार व खाते वाटप होण्याची अपेक्षा होती ती झाली आहे. तीन पार्टनर एकत्र आल्यामुळे एकमेकांची खाती एकमेकांकडे जाणे स्वाभाविक आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.














