Ajit Pawar: जयंत पाटलांची चर्चा अन् अजित पवारांची ‘ती’ विधानं, पत्रकारांनी करून दिली आठवण
जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली आहे. त्यावर खुद्द जयंत पाटील यांनी देखील स्पष्टीकरण देत अशी कुठलीही भेट झाली नसल्याचं सांगितलं. यावर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केलं. यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना त्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून दिली.