जालन्यात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. राजकीय वर्तुळातून या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यानंतर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जालना दौरा केला. त्यातचं मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली; तत्पूर्वी आंदोलनस्थळी जात असता रस्त्यात मध्येच त्यांची गाडी आंदोलकांनी अडवली त्यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला.