महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे यांनी जिव्हाळा ट्रस्ट संचलित उभारी मतिमंद व बहुविकलांग मुलांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यावेळी गौरव मोरे यांनी फटाके फोडत मुलांसमवेत दिवाळीचा आनंद लुटला आहे. “दिवाळी हा सण सगळ्यांसोबत साजरा करायचा असतो म्हणून आज इथे आलो व इथे येऊन खूप छान वाटलं, मुलांसोबत खूप गप्पा मारल्या” असं म्हणत गौरव मोरे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.


















