गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीमधील काही कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसून आले. यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी शरद पवारांना ओळखतो. अजित पवार आणि शरद पवार कितीही एकत्र दिसले तरी २०२४च्या निवडणुकीत शरद पवार त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. जसे त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोनच नेत्यांचे राजकारण होतं. तसंच उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोनच नेते महाराष्ट्रात पुढे यशस्वी झालेले दिसतील”