पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र याच बालेकिल्ल्यातून आता अजित पवारांना एक- एक धक्का बसत असल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि तसा इशारा दिला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली असून महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याने ते अशा प्रकारे वेगवेगळ्या पक्षातील उमेदवार घेत असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे.