पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, असल्या सोम्यागोम्याने बोललेल्यावर मी बोलत नाही, अशी भूमिका मांडत संजय राऊत यांच्या टीकेला अजित पवार यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं होतं. यावर आता पुन्हा राऊतांनी निशाणा साधलाय.