२०६व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि क्रीडा युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी अभिवादन केले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर अजित पवार यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी नववर्षानिमित्त काय संकल्प केला? यावर प्रतिक्रियाही दिली.